Corona Cases Rise : देशातील वेगवेगळ्या ठिकाणी करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.
Corona Cases Latest Update : भारतात करोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी ८ वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार सध्या करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या शुक्रवारी ५,३६४ पर्यंत पोहचली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात ७६४ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे, यापैकी २ केरळ आणि प्रत्येकी एक पंजाब आणि कर्नाटक येथे झाला आहे.

महाराष्ट्राची स्थिती काय?
महाराष्ट्रात शुक्रवारी ११४ नवीन कोविड – १९ चे रुग्ण आढळले, यामुळे जानेवारीपासून एकूण रुग्णांची संख्या १,२७६ वर पोहचली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू देखील झाला, ज्यामूळे मृत्यूंची संख्या १८ वर पोहचली आहे. पुणे (४४) आणि मुंबई (३७) येथे सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत मीरा भांयदर आणि पनवेल येथे प्रत्येकी सात रुग्णांची नोंद झाली आहे.
पश्चिम बंगालमध्ये गेल्या २४ तासांत ५८ नव्या कोविड-१९ रुग्णांची भर पडली आहे तर ९१ जण बरे झाले आहेत. एकूण सक्रिय रुग्ण सध्या ५९६ असून राज्यात एक मृत्यू नोंदवला गेला आहे.
दिल्लीत ३० नवीन करोना रुग्ण आढळले असून सक्रिय रुग्णांची संख्या ५९२ वर पोहोचली आहे, गुरुवारपासून एकही नवीन मृत्यू झालेला नाही, त्यामुळे १ जानेवारीपासून एकूण मृतांची संख्या सात झाली आहे. छत्तीसगडमध्ये शुक्रवारी ५० नवे करोना रुग्ण आढळले आहेत.
हरियाणामध्ये देखील शुक्रवीर ३१ नवे रुग्ण आढळले आहेत, ज्यापैकी गुरुग्राम (९) आणि फरिदाबाद (११) येथे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात सध्या ८७ सक्रिय रुग्ण आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की बहुतांश प्रकरणे ही सौम्य स्वरूपाची आहेत आणि त्यांना घरीच उपचार दिले जात आहेत. तसेच या रुग्णसंख्येच्या वाढीमुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याचेही तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने मे २०२३ मध्ये कोविड-१९ चा सार्वजनिक आरोग्य आणीबाणी (public health emergency) हा दर्जा अधिकृतपणे संपुष्टात आणला आहे. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांकडून हा आजार हंगामी, इनडेमिक, सतत येणारा किंवा मर्यादित विशिष्ट भागासाठी असणारा अजार असल्याचे सांगितले जात आहे.
0 Comments