बांधकाम कामगार योजना : Bandhkam Kamgar Yojana 2025

 Bandhkam Kamgar Yojana : संपूर्ण माहिती (२०२५): मागील काही वर्षांपूर्वी मी स्वतः एका "महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ" च्या साइटवर काम करायचो. त्यावेळी माझ्या जवळच्या सहकाऱ्यांना "बांधकाम कामगार योजने" बद्दल फारशी माहिती नव्हती. 

Viral Marathi Hindi News

Viral Marathi Hindi News


पण आता २०२५ मध्ये हि योजना विशेषतः तात्पुरत्या बांधकाम कामगारांसाठी खूप उपयुक्त आहे. जर तुम्ही बांधकाम व्यवसायात असाल किंवा या योजनेचे फायदे घेऊ इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. Bandhkam Kamgar Yojana बद्दल सविस्तर माहिती वाचा.

बांधकाम कामगार योजना काय आहे?

ही महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे, जी बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सामाजिक सुरक्षा, आरोग्य, विमा आणि इतर खूप साऱ्या फायदे प्रदान करते. यामध्ये बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी केली जाते आणि त्यांना एका वर्षासाठी स्मार्ट कार्ड दिले जाते ज्याद्वारे ते विविध महाराष्ट्र सरकारी योजनांचे लाभ घेऊ शकतात.

बांधकाम कामगार योजनेच्या अटी व शर्ती

    • फक्त १८ ते ६० वयोगटातील बांधकाम कामगार पात्र आहेत.
    • बांधकामाच्या ठिकाणी किमान ९० दिवस काम केले आहे.
    • नोंदणी करताना आधार कार्ड, निवास प्रमाणपत्र आणि कामगाराचा फोटो आवश्यक आहे.
    • कामगाराला स्मार्ट कार्ड मिळाल्यानंतर, तो विविध फायदे घेऊ शकतो.

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत लाभ

महाराष्ट्र सरकारची "महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ" म्हणजे बांधकाम कामगार योजना ही महत्व पूर्ण योजना आहे जी राज्यातील बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवते. बांधकाम कामगारांच्या या योजनांचा उद्देश कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास आणि आर्थिक अनुदान देऊन मदत करणे होय. चला तर मग योजना खालीलप्रमाणे : 

१. शैक्षणिक योजना -

    • सामान्य शिष्यवृत्ती: कामगारांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती. 
    • परदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती: परदेशात पदव्युत्तर शिक्षणासाठी आर्थिक मदत. 
    • क्रीडा शिष्यवृत्ती: खेळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती. 
    • पाठ्यपुस्तक आर्थिक मदत: शैक्षणिक पाठ्यपुस्तकांसाठी अनुदान. 
    • एमएस-सीआयटी आर्थिक मदत: संगणक प्रशिक्षणासाठी मदत. 

२. आरोग्य आणि आर्थिक सहाय्य योजना -

    • गंभीर आजारांवर उपचार आर्थिक सहाय्य: हृदयरोग, असो किंवा कर्करोग, इत्यादींसाठी अनुदान दिले जाते
    • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY): कमी खर्चा वर कामगारांसाठी अपघात विमा इत्यादींसाठी अनुदान दिले जाते
    • आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत: या योजनेत आत्महत्या करणाऱ्या कामगारांच्या कुटुंबियांना अनुदान दिले जाते.

३. प्रशिक्षण आणि कौशल्य विकास योजना -

    • चालक प्रशिक्षण: कामगारांना चालक प्रशिक्षण देणे. 
    • इंग्रजीसह परदेशी भाषा संभाषण प्रशिक्षण: इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये प्रशिक्षण.
    • स्पर्धा परीक्षा तयारी प्रशिक्षण: यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग इत्यादी स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन 

४. इतर योजना -

    • साहित्य प्रकाशन अनुदान: पुस्तक प्रकाशनासाठी कार्यरत लेखकांना मदत. 
    • शिलाई मशीन अनुदान योजना: महिला कामगारांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना शिलाई मशीन प्रदान करणे. 
    • कामगार आणि कुटुंबियांचा लांब पल्ल्याचा प्रवास: रेल्वे/एसटी प्रवासासाठी सवलत.

पात्रता आणि अपात्रता

पात्रता:

    • बांधकाम क्षेत्रात काम करणारे तात्पुरते किंवा कायमचे कामगार.
    • कामगाराचे नाव कामगार विभागाच्या यादीत असले पाहिजे.

अपात्रता:

    • सरकारी कर्मचारी किंवा इतर संस्थांमध्ये कायमस्वरूपी नोकरी.
    • ज्यांना आधीच इतर सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ मिळत आहेत.

बांधकाम कामगारांना अर्ज करण्यसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

    • आधार कार्ड
    • पत्त्याचा पुरावा
    • जन्मतारीख प्रमाणपत्र (शालेय प्रमाणपत्र/स्वतः साक्षांकित)
    • २ पासपोर्ट आकाराचे फोटो
    • बांधकाम ठेकेदार चे ओळखपत्र

बांधकाम कामगार म्हणून ऑनलाइन नोंदणी कशी करावी?

    • सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या – [https://bocw.gov.in]
    • नंतर नवीन नोंदणी - “बांधकाम कामगार नोंदणी” वर या नावावर क्लिक करा.
    • नंतर फॉर्म भरा - सर्व विचारलेली माहिती भरा.आणि विचारलेले कागदपत्रे अपलोड करा.
    • शेवटी सबमिट करा - सबमिट नावावर क्लिक करून नोंदणी क्रमांक मिळवा, तो सांभाळून ठेवा.

बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड करा

एकदा तुम्ही ऑनलाईन नोंदणी केली की, तुम्ही तुमचे स्मार्ट कार्ड पण ऑनलाइन डाउनलोड करू शकता. हे कार्ड कामगारांना ओळखण्यासाठी वापरले जाते आणि त्यावर एक विशिष्ट असा ओळख क्रमांक असतो. तो स्मार्ट कार्ड हवा असेल तर आपल्या जिल्ह्यातील बांधकाम कामगार च्या कार्यालयात जाऊन विचारणा केल्यानंतर लगेच मिळेल.

Download Bandhkam Kamgar Yojana Pdf Form

Post a Comment

0 Comments