गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागांत मुसळधार पावसामुळे शेतीकामात अडथळे निर्माण झाले होते. (Maharashtra Weather Update)
मान्सूनमध्ये विश्रांतीची संधी! शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा |
मात्र, आता हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी होणार असून, मशागत व खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची 'उघडीप' मिळणार आहे. (Maharashtra Weather Update)
हीच यादरम्यान शेतीच्या तयारीसाठी एक सुवर्णसंधी ठरू मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर हवामानाचा अंदाज आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती आहे.(Maharashtra Weather Update)
माणिकराव खुळे (नि. हवामानतज्ज्ञ, IMD पुणे) यांच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरताना दिसणार असून, शेतकऱ्यांना मशागत व पेरणीसाठी आवश्यक अशी उघडीप मिळण्याची शक्यता आहे.
पावसाचा जोर ओसरणार
1) आज (२९ मे) पासून ते ३ जून या कालावधीत मुंबई व कोकण वगळता महाराष्ट्रातील इतर २९ जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हळूहळू कमी होईल.
2) मुंबई व कोकणात मात्र सोमवार, २ जूनपर्यंत पावसाचा जोर टिकून राहणार आहे.
3) इतर भागात पावसात थोडीशी विश्रांती मिळेल, जी शेतीसाठी फायदेशीर ठरेल.
0 Comments