Maharashtra 11th Admission 2025: ‘अशी’ करा अकरावीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया; शालेय शिक्षण विभागाच्या सूचना, संपूर्ण ऑनलाइन प्रक्रियेबाबत माहिती

Maharashtra 11th admission 2025: अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाने राज्यभरातील प्रवेश क्षमतेची माहिती प्रसिद्ध केली. या माहितीनुसार राज्यातील ९२८१ नोंदणी केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मिळून २० लाख ४३ हजार २५४ जागा अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यात सर्वाधिक म्हणजेच आठ लाख ५२ हजार २०६ जागा विज्ञान शाखेच्या आहेत...

११ वी प्रवेश २०२५: ऑनलाईन प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती 



सोमवारी सुरू होणाऱ्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालक यांना मार्गदर्शन करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने खास सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचनांद्वारे संपूर्ण ऑनलाइन प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाने केला आहे. विद्यार्थ्यांनी अजिबात गोंधळून न जाता शांतपणे प्रवेश प्रक्रियेला सामोरे जावे, पहिले दोन दिवस सराव सत्र असून त्याची विद्यार्थ्यांना मदत होईल, असे आवाहनही संचालनालयाने केले आहे.

11th admission process steps: असे असतील टप्पे -

  • 1) https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर जा
  • 2) त्यानंतर राहण्याचे ठिकाण (तालुका) निवडा
  • 3) संकेतस्थळाच्या दर्शनी पानावर ‘न्यू रजिस्ट्रेशन’ या पर्यायावर क्लिक करा
  • 4) उघडणाऱ्या पानावर नाव, मोबाइल नंबर, इमेल आयडी ही वैयक्तिक माहिती       
  •      अचूक भरा
  • 5) इयत्ता दहावी परीक्षेचा बैठक क्रमांक, उत्तीर्ण होण्याचे वर्ष व शिक्षण मंडळ याची  
  •       माहिती भरा
  • 6) आवश्यक प्रश्नांची उत्तरे देऊन सुरक्षित पासवर्ड तयार करून नोंदणी पूर्ण करा
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मिळालेला लॉगइन आयडी आणि अर्ज क्रमांक जपून ठेवा
Online Admission form for 11th Standard: अर्ज क्रमांक १ भरणे -
  • 1) लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून संकेतस्थळाच्या डॅशबोर्डवर लॉग इन करा
  • 2) तुमचे नाव, पत्ता, पालकांचे संपर्क क्रमांक, त्यांच्या व्यवसाय, इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरा
  • 3)  तुमचा प्रवर्ग निवडा
  • Documents required for 11th admission: आवश्यक कागदपत्रे भरणे - पुढील टप्प्यात खालील आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील :
  • 1) इयत्ता दहावीची गुणपत्रिका
  • 2) रहिवासी पुरावा
  • 3) जातीचा दाखला
  • 4) पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो
  • 5) आधार कार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला

Post a Comment

0 Comments